मुंबई

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई सराईत मद्य तस्कर ताब्यात

CD
उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत मद्य तस्कर ताब्यात विदेशी मद्य आणि वाहनासह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त मनोर, ता. ५ ः उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी (ता. ५) पहाटे जव्हार तालुक्यातील पिंपळशेत-तलावली रोडवरील आकरे गावच्या हद्दीत कारवाई केली. यात २०० बल्क लिटर विदेशी मद्यासह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असून तो विक्रोळी भेसळयुक्त दारू कांड प्रकरणात तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी पहाटे जव्हार तालुक्यातील आकरे गावच्या हद्दीत पिंपळशेत तलावली रोडवर भरारी पथकाकडून सापळा रचण्यात आला होता. या वेळी एका संशयित कारची एमएच ०२ सीआर १५१४ तपासणी केली असता कारमध्ये दादरा- नगर- हवेली, दीव-दमण बनावटीचे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. कार आणि २००.८८ बल्क लिटर विदेशी मद्य मिळून सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रमेश ज्ञानेश्वर पोखरकर आणि चंद्रकांत राम जाधव अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपीविरोधात महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना गुरुवारपर्यंत एक्साईज कस्टडी सुनावली आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. विठ्ठल भुकन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक शंकर सीताराम आंबेरकर, दुय्यम निरीक्षक पांडुरंग तुकाराम पडवळ, उदय अनंत शिंदे, जवान भाऊसाहेब कराड, देविदास सोमवंशी, संदीप पवार, प्रशांत निकुंभ, अनिल पाटील यांनी प्रत्यक्ष भाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पोलिसांसोबत कर्तव्य बजावणारे ९०० होमगार्ड मानधनाविना

SCROLL FOR NEXT