मुंबई

बायोमेट्रीक हजेरी बंद करा

CD
बायोमेट्रीक हजेरी बंद करा कामगार संघटनांची मागणी सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. ५ : कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमिवर महापालिकेतील बायोमेट्रीक हजेरी बंद करावी ही मागणी कामगार वर्गातून करण्यात येत आहे. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी लावावी लागते. एकाच मशिनला हजारो कामगारांचे एकाच वेळेस बोटांचे ठसे लावावे लागत आहेत. अशा परिस्थितीत एखादा कर्मचारी बाधित असल्यास त्याची लागण इतर कर्मचाऱ्यांना होण्याची भीती व्यक्त होत आहे. नवी मुंबई पुन्हा एकदा कोविड रुग्णांचा उद्रेक झाला आहे. २१ डिसेंबर २०२१ पर्यंत शहरात कोरोना नव रुग्णांची संख्या जेमतेम १६ इतकी होती. पण अवघ्या १२ ते १३ दिवसांतच कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा ३ हजारांपर्यंत गेला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाय केल्या जात आहेत. तोंडाला मास्क लावणे, निर्जंतुकीकरण करणे, लसीकरण आदी उपाय केले जात आहेत. परंतु आजही महापालिकेत कामाला आल्यावर हजेरी लावताना बायोमेट्रीक पद्धतीचा वापर सुरु आहे. कोविडचे रुग्ण वाढीस लागल्याने सद्यःस्थितीत शहरात अनेक ठिकाणी कोविड संसर्ग असणारे नागरिक आजूबाजूला फिरत आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या बाधित कर्मचाऱ्यातर्फे बायोमेट्रीक मशिनला विषाणू लागले तर त्याचा महापालिकेत प्रसार व्हायला वेळ लागणार नाही. चे सध्याच्या काळात हे धोकादायक असून कर्मचाऱ्यांमध्ये व अधिकाऱ्यांमध्ये यामुळे कोरोना संसर्गाचा धोका बळावण्याची भीती आहे. त्यामुळे कोरोनाचे पूर्णपणे निर्मूलन होईपर्यंत आपण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरीबाबत बायोमेट्रिक कार्यप्रणाली स्थगित करून पूर्वीची पध्दत वापरावी. कोरोना काळापुरता हा बदल करून लवकरात लवकर या बदलाची अंमलबजावणी करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या इंटक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली आहे. ------------------------------------- एनएमएमटीतील कर्मचाऱ्यांकडून थुंकीचा वापर महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी लावावी लागते. हजेरीकरिता बस डेपो आणि कार्यालयांमध्ये लावण्यात आलेले बायोमेट्रीक मशिनवर बोटे चिकटवल्यानंतर ठसा न उमटल्यास काही जण तोंडातील थुंकीने बोट साफ करतात. त्यानंतर पुन्हा तेच बोट बायोमेट्रीक मशिनला लावतात. अशा घाणेरड्या पद्धतीमुळे बायोमेट्रीक मशिनवर हजेरी लावणे जीवावर बेतू शकते अशी माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT