मुंबई

नवी मुंबईत कोविड रुग्णांचा उद्रेक

CD
नवी मुंबईत १३२४ नव्या रुग्णांची नोंद ; पनवेलमध्ये एक जण ओमिक्रॉन बाधित सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. ५ : नवी मुंबई महापालिका हद्दीत कोविडच्या रुग्णवाढीचा आज (ता.५) भडका उडाला. बुधवारी शहरात तब्बल एक हजार ३२४ नव्या रुग्णांची नोंद झाली. महापालिकेतर्फे एकूण १५ हजार पेक्षा जास्त लोकांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन दिवसात नवी मुंबईत सुमारे अडीच हजार नव्या रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. पनवेल महापालिकेत ४७५ इतक्या नव्या रुग्णांसहीत एका ओमिक्रॉन रुग्णाची नोंद झाली. कोविडच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णवाढीला पुन्हा एकदा कमालीचा वेग प्राप्त झाला आहे. सपाट्याने रुग्णवाढ होत असल्याने रुग्ण दुपटीच्या कालावधीतही घट झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने आज १५ हजार पेक्षा जास्त चाचण्या केल्या. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ७ हजार ९०६ ॲन्टीजेन आणि ६ हजार १३६ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी एक हजार ३२४ लोक कोविडबाधित असल्याचे निष्पन्न झाले. पनवेलमध्येही रोजच्या रोज कोविड रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. --------------------------------------- पाच दिवसांत ३ हजार ७३२ नवे रुग्ण नवी मुंबई शहराची नव्या वर्षात महागडी सुरुवात झाली. जानेवारी महिन्याच्या १ तारखेपासून कोविड रुग्णांचा आलेख वाढू लागला. १ जानेवारीला ३२२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर हळूहळू वाढ होत २ जानेवारीला ५३२, ३ जानेवारीला ४९१, ४ जानेवारीला १०७२ आणि ५ जानेवारीला १३२४ अशा एकूण ३ हजार ७३२ नव्या रुग्णांची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT