मुंबई

उल्हासनगरात शिवसेनेच्या माजी महापौरांच्या पतीची प्रॉपर्टी सील

CD
उल्हासनगरात शिवसेनेच्या माजी महापौरांच्या पतीची प्रॉपर्टी सील ७ लाख थकबाकी; करबुडव्यांचे धाबे दणाणले उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) ः शिवसेनेच्या माजी महापौर विद्या निर्मळे यांचे पती विजय निर्मळे यांच्या नावावर असलेली कमर्शियल प्रॉपर्टी आज मालमत्ता कर विभागाच्या उपआयुक्त प्रियंका राजपूत यांच्या नेतृत्वाखाली सील करण्यात आली आहे. या कारवाईने उल्हासनगरात खळबळ उडाली असून करबुडव्यांचे धाबे दणाणून गेले आहे. कॅम्प नंबर ५ मध्ये स्वामी सर्वानंदन हॉस्पिटलच्या मागे विजय निर्मळे यांच्या नावावर ही कमर्शियल प्रॉपर्टी आहे. चार वर्षांची मिळून त्यांच्याकडे मालमत्ता कराची सात लाखांची थकबाकी होती. याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष सांगूनही निर्मळे यांनी त्यास प्रतिसाद दिला नसल्याने उपआयुक्त प्रियंका राजपूत, सहायक आयुक्त गणेश शिंपी, महेंद्र पंजाबी, कर निर्धारक व संकलक जेठाचंद ताराचंदानी, उपकर निर्धारक व संकलक मनोज गोकलानी यांनी ही प्रॉपर्टी सील केली. निर्मळे यांनी थकबाकी भरल्यावर त्यांची सील केलेली प्रॉपर्टी पुन्हा उघडून दिली जाणार, अशी माहिती प्रियंका राजपूत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जवळपास ५० हजार करबुडव्यांवर दीडशे ते दोनशे कोटींची थकबाकी आहे. या वर्षी १०० कोटी वसुलीचे टार्गेट असून संपत्ती जप्तीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. करबुडवे पुन्हा अभय योजना लागू होणार या प्रतीक्षेत आहेत, पण ही योजना यापूर्वी अनेकदा लागू करण्यात आल्यावरही करबुडवे थकबाकी भरण्यास पुढे येत नाहीत. अभय योजना लागू होणार नसल्याने मालमत्ता कर भरणा आणि प्रॉपर्टीजप्तीच्या बदनामीतून स्वतःची सुटका करणे हाच एकमेव पर्याय करबुडव्यांकडे असल्याचा इशारा उपआयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT