मुंबई

भिवंडीत सिमेंट प्लँटमुळे प्रदूषण

CD
अंजूर मानकोलीत सिमेंट प्लँटमुळे प्रदूषण डोळे चुरचुरणे, खोकल्याने नागरिक हैराण भिवंडी, ता. ६ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील अंजूर मानकोली या भागात बसविण्यात आलेल्या चार सिमेंट प्लँटमुळे परिसरातील ग्रामस्थ नागरिकांना प्रदूषणासह रस्त्यावर येथून होणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे महसूल प्रशासनासह लोकप्रतिनिधी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. याबाबत तहसीलदारांनी कारवाई करावी यासाठी लेखी तक्रार ग्रामस्थांनी दिली आहे. भिवंडी तालुक्यातील मौजे अंजूर मानकोली, दिवे अंजूर या ग्रामपंचायत हद्दीत चार सिमेंट प्लँट असून येथील प्लँट चोवीस तास सुरू असतात. येथून सिमेंट रेडी मिक्सरच्या अवजड वाहनांची वाहतूकही चोवीस तास सुरू असते. सिमेंट प्लँटमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना खोकला, डोळे चुरचुरणे आदी विकार जडले आहेत. या प्लँटवर योग्य कारवाई केली नाही तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. यासंबंधी लेखी निवेदन येथील मनीष तरे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना दिले आहे. येत्या दोन दिवसांत महसूल अधिकाऱ्यांमार्फत घटनास्थळाची पाहणी करण्यात येईल. संबंधित दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. - अधिक पाटील, तहसीलदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ceasefire: इस्रायलकडून बेरूतवर मोठा हवाई हल्ला; ८० जणांचा मृत्यू, १०० लोक जखमी, इराणकडून होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर बंदी

Shaktipeeth Highway On Raju Shetti : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन नकाशाला राजू शेट्टींचा विरोध, सांगली, कोल्हापुरातून पुन्हा आंदोलन पेटणार

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT