मुंबई

पालिकेची शुक्रवारी होणारी महासभा ऑनलाईन

CD
पनवेल पालिकेची महासभा ऑनलाईन कोरोना संसर्ग वाढल्‍याने प्रशासनाचा निर्णय पनवेल, ता. ६ (प्रतिनिधी) ः राज्यातील पालिकांच्या महासभा, स्थायी समिती व इतर सर्व वैधानिक समित्यांच्या सर्व बंधनकारक बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे/ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात, असा आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने काढला आहे. परिणामी पनवेल महापालिकेची शुक्रवारी (ता. ७) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेली सर्वसाधारण महासभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या राज्यातील नागरी स्थानिक संस्थांच्या सभा प्रत्यक्ष उपस्थितीने घेण्याबाबत २२ ऑक्टोबर रोजी नगरविकास विभागाने आदेश जारी केले होते. मात्र पनवेल पालिका क्षेत्रातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याची गंभीर दखल घेत मोठ्या प्रमाणावरील एकत्रीकरण टाळण्याच्या दृष्टीने राज्यातील महापालिकांच्या सर्व बंधनकारक सभा, बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे/ऑनलाईन पध्दतीनेच घेण्यात याव्यात, असा आदेश नगरविकास विभागाच्या अवर सचिवांना काढला आहे. पनवेल महापालिकेच्या शुक्रवारी आयोजित महासभेत नगरसेवकांचा अभ्यास दौरा, शाळांच्या वर्गखोल्यांची बांधणी, पालिका हद्द हागनदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न तसेच उद्यानांची देखभाल या सारख्या विषयांवर चर्चा होऊन मंजुरी घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

CNG गॅस भरताना टाकीचा स्फोट, कारच्या चिंधड्या; इतर गाड्यांचेही नुकसान, घटनेचा VIDEO VIRAL

Vijay Mallya : मल्ल्याने म्हटलं बँकांनी जास्त पैसे वसूल केले, पण SBIच्या प्रतिज्ञापत्रात वेगळाच दावा; ८,७५२ कोटी बाकी, पुढे काय होणार?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

‘Limboti Dam Wate: लिंबोटी’त ३५ टक्के साठा, दोन दिवसांआडचा पुरवठा ४ दिवसांवर येणार; कंधार शहराला तीन महिनेच पुरणार पाणी!

SCROLL FOR NEXT