मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका ‘ऑन फिल्ड’, गर्दुल्ल्यांना हुसकावले

CD
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका ‘ऑन फिल्ड’ तीन हात नाक्यावरील गर्दुल्ल्यांना हुसकावले सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ६ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने ‘ऑन फिल्ड स्वच्छता मोहीम’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील गजबजलेले ठिकाण असलेल्या तीन हात नाक्यावर ठाण मांडून बसलेले गर्दुल्ले, भिकारी, विक्रेते यांना तेथून हुसकावून लावले आहे. या सर्वांमुळे अस्वच्छता पसरून ठाणे शहराला डाग लागला होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या अस्वच्छतेविरोधात शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी पालिका महासभेत आवाज उठवला होता. त्यानुसार पालिकेने स्वच्छतेवर भर देत ही कारवाई केली. मुंबईहून ठाण्यात येणाऱ्यांचे तीनहात नाक्यावरूनच आगमन होते; परंतु या नाक्यावरील अस्वच्छतेने ठाणे महापालिकेवर एकप्रकारे डाग लागला होता. शहरातील नेहमी गजबजलेला चौक म्हणून तीन हात नाक्याकडे पाहिले जाते. आनंदनगर असो वा मॉडेल चेक नाका येथून ठाण्यात आल्यावर प्रामुख्याने हा चौक पहिल्यांदा लागतो. त्यामुळे मुंबईतून ठाण्यात आल्यावर तीन हात नाका परिसरात उड्डाणपूल, गुरुद्वारासमोरील व इटर्निटी मॉलजवळील सर्व्हिस रोड परिसरात ठाण मांडून बसणाऱ्या भिकारी, गर्दुल्ले व विक्रेत्यांमुळे अस्वच्छता पसरत होती. डिसेंबर महिन्यातील महासभेत यासंदर्भात शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी आवाज उठवून तो परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली होती. त्या वेळी प्रभारी आयुक्त संदीप माळवी यांनी स्वतः लक्ष घालून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार बुधवारी (ता. ५) नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांच्या पथकाने स्वच्छता मोहीम हाती घेत भिकारी, गर्दुल्ले व विक्रेत्यांना हुसकावून लावले आणि परिसर स्वच्छ केला. तीन हात नाक्यावरील अस्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. त्यातच येथील अस्वच्छता शहरात एक डाग लावत होती. त्यासंदर्भात महासभेत विषय चर्चेला आणला. त्यानुसारच हा परिसर स्वच्छ झाला असून तो असाच स्वच्छ राहील, याची जबाबदारी पालिका प्रशासनाने घ्यावी. - विकास रेपाळे, नगरसेवक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajrang Sonawane : 'विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा वाल्मिक कराडचा डाव', बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप; कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली

Mumbai Weather: मुंबईकरांनो सावधान! पुढचे ७२ तास घराबाहेर पडताना काळजी घ्या; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Latest Marathi News Live Update : शरद पवार उद्यापासून दुष्काळ दौऱ्यावर; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

स्टार होण्यापूर्वी 'या' ठिकाणी राहायची माधुरी दीक्षित; ही होती घरातली आवडती जागा, मग अभिनेत्रीने का सोडलेलं घर?

Ujani Dam Investment: उजनी धरण परिसरात १.६५ लाख कोटींची गुंतवणूक; AI डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलर, ग्रीन हायड्रोजनसह चार प्रकल्प

SCROLL FOR NEXT