मुंबई

सिंधुताई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार सुरू करावा!

CD
सिंधुताई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार सुरू करावा रामदास आठवले यांची राज्य सरकारकडे मागणी सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ६ : अनाथांच्या माता पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्र नव्हे तर देशाचे नुकसान झाले आहे. सिंधुताई सपकाळ या स्त्री-शक्तीच्या प्रतीक होत्या. त्यांचे जीवन हे संघर्षमय राहिले आहे. मूर्तिमंत ममत्व आणि संघर्षातून फुललेले कर्तृत्व यामुळे सिंधुताई या महिलांच्या आदर्श ठरल्या आहेत. त्यामुळे सिंधुताई सपकाळ यांचे राज्य शासनाने स्मारक बांधावे, तसेच त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार सुरू करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड दुःख सहन केले. अनाथ मुलांचा ममतेने सांभाळ करून त्यांनी अनेकांना घडवले. निराधार स्त्री म्हणून त्यांनी स्वतःला कमकुवत समजले नाही; तर त्यांनी हिमतीने अनेकांना आधार दिला. निराधारांना आधार देणाऱ्या त्या आधारस्तंभ झाल्या. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने सिंधुताईंचा गौरव पद्मश्री पुरस्काराने केला आहे. राज्य सरकारनेही त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिला सक्षमीकरण क्षेत्रात पुरस्कार सुरू केल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT