मुंबई

अतिक्रमण कायमस्वरुपी कारवाई हवी

CD
अतिक्रमणावर कायमस्वरूपी कारवाई हवी परिस्थिती जैसे थे होण्याची नागरिकांमध्ये चर्चा घणसोली, ता. ६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेकडून घणसोली विभागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. भविष्यातही कारवाई सुरूच राहील, असे विभाग अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र नागरिकांनी पालिकेची कारवाई तात्पुरती असल्याचे म्हटले आहे. महापालिकेकडून यापूर्वी अनेक वेळा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र कारवाईला आठवडा उलटलाच, पुन्हा फेरीवाले त्याच जागांवर बस्तान मांडतात. याचा फटका चालकांना बसतो आणि वाहतूककोंडी सुरू होते. घणसोली विभागात वाढत्या फेरीवाल्यांच्या तक्रारी महापालिकेकडे अनेक वेळा करण्यात आल्या आहेत. कारवाई करून पुन्हा अतिक्रमण न करण्याचा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात येतो. मात्र काही न समजल्यागत पुन्हा फेरीवाले आपले दुकान मांडतात. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाने कितीही कठोर कारवाई केली, तरी त्याचा गंभीर परिणाम होणार नाही, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. सध्या नवी मुंबई परिसरात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. फेरीवाल्यांनी रस्ते, पदपथांवर अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना जाण्यासाठी जागा नसल्याने गर्दी होते. परिणामी कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी कारवाई करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. कोट पालिकेच्या अधिकाऱ्यांचा दरारा नसल्याने फेरीवाले पुन्हा आपला व्यवसाय सुरू करत आहेत. त्यांना वारंवार सांगूनही काही फायदा होत नाही. अनेक फेरीवाले ही बाहेरचे असल्याने ते बिनधास्त वावरत आहेत. - रवी पाटील, घणसोली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT