मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वच्छतेची शपथ

CD
राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वच्छतेची शपथ घणसोली (बातमीदार) : नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोकशेठ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ येथील सेक्टर ६ मधील राजमाता जिजाऊ उद्यान आणि तानाजी मालुसरे क्रीडांगण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव पवार आणि कार्यकर्ते आणि श्रमदान करत स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी नवी मुंबई मनपा अधिकारी यांनी वसुंधरा स्वच्छता मोहिमेची शपथ दिली. नेरूळ येथील जिजामाता उद्यानाला अस्वच्छतेमुळे बकालपणा आला होता. खेळणी तुटलेल्या अवस्थेत, तर गवत वाढलेले होते तशीच स्थिती क्रीडांगणाची झाली होती. रविवारी (ता. २) सकाळी महादेव पवार यांच्या पुढाकाराने सेक्टर ६ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध हौसिंग सोसायटीतील पर्यावरणप्रेमी नागरिक आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान करत उद्यान आणि क्रीडांगण स्वच्छ केले. या मोहिमेत यशवंत मोहिते, प्रमोद शेळके, सविता यादव, सुजाता घारे, सुषमा पवार, प्रशांत सोळसकर यासह पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT