मुंबई

पदवी-पदव्युत्तच्या ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यापीठाची तयारी

CD
पदवी-पदव्युत्तरच्या ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यापीठाची तयारी सुरू मुंबई, ता. ६ : ओमिक्रॉन आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठ आणि संलग्न सर्व वरिष्ठ महाविद्यालये आजपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यापीठाने आपल्याकडील हिवाळी सत्राच्या परीक्षाही ऑनलाईन घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. विद्यापीठात सध्या हिवाळी सत्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन त्या आजपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत. १४ जानेवारीपासून विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि इतर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी, पदव्युत्तर, पदविका आदींच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्या २८ जानेवारीपर्यंत चालणार असून आॅनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली. पदवीच्या प्रथम वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसत असतात. यंदा मुंबई आणि परिसरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील नेट व इतर सुविधा आदींचा विचार करून त्यासाठीचे वेळापत्रक तयार केले जात आल्याची माहितीही विद्यापीठाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

Telegram Ban India : NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरू

Latest Marathi News Live Update : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी निकाल लांबणीवर

Neeraj Chopra: दुखापतीनंतर नीरज चोप्रा थेट 'या' मोठ्या स्पर्धेतून मैदानात उतरणार! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निवडीबाबत मोठी अपडेट

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

SCROLL FOR NEXT