मुंबई

चमत्कार प्रात्यक्षिके दाखवून अंधश्रद्धेची पोलखोल

CD
चमत्कार प्रात्यक्षिके दाखवून अंधश्रद्धेची पोलखोल ऐरोलीत जादूटोणा विरोधी कायद्याचे व्याख्यान तुर्भे, ता. ६ (बातमीदार) : सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून जादूटोणाविरोधी कायद्यावर व्याख्यान नुकतेच झाले. अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे जिल्हा शाखा व श्री संत सावता माळी मंडळ ऐरोली यांच्या विद्यमाने ऐरोलीतील श्री संत सावता माळी सभागृह येथे चमत्कार प्रात्यक्षिकसह व्याख्यान हा कार्यक्रम पार पडला. या व्याखानाचा मूलभूत उद्देश हा जादूटोणाविरोधी कायदा प्रसार, प्रबोधन व प्रसारासाठी करण्यात आले. ठाणे जिल्हा अ. भा. अंनिसचे अध्यक्ष डॉ. प्रकाश ढोकणे यांनी चमत्कार प्रात्यक्षिके करून त्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोनाचे स्पष्टीकरण केले. हरिभाऊ पाथोडे यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांचे समाज प्रबोधनाचे काम, वर्णव्यवस्था भेदण्यासाठी सत्यशोधक समाजाची आवश्यकता आणि शिक्षणाचे महत्त्व व अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची ४० वर्षांची वाटचाल याविषयी संवाद साधला. डॉ. हर्षा गोयल यांनी आज भारतीय नारीची जी काही प्रगती झाली आहे, त्याचे सारे श्रेय सावित्रीबाईंनाच द्यावे लागते, असे सांगितले. रवी खानविलकर यांनी प्रत्येक चमत्कारामागे काही ना काही कार्यकारणभाव असतो. महाराष्ट्रातील २०१३ सालचा जादूटोणा विरोधी कायदा हा सर्वसामान्य माणसाच्या डोक्यातील अंधश्रद्धा दूर करणारा कायदा असल्याचे स्पष्ट केले. नीता डुबे, चंद्रकांत सर्वगोड, जगन्नाथ साबळे यांनी भूत, भानामती, देवी अंगात येणे यांसारख्या अंधश्रद्धांमध्ये केले जाणारे पाण्याने दिवा पेटवणे, जळता कापूर खाणे, अंगावरून जळता टेंबा फिरवणे, केळेवाला बाबा, मंत्राने अग्नी पेटवणे आदी चमत्कार प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यामागील कार्यकारणभाव आणि विज्ञान स्पष्ट करून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT