मुंबई

पालघरमधील पहिली ते पाचवीच्या शाळा बंद

CD
वाढत्या कोरोनामुळे पालघरमधील शाळा बंद पालघर, ता. ५ ः पालघर जिल्ह्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील निवडक क्षेत्रांतील १ ते ५ वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. यात वसई-विरार महापालिकेसह पालघर, डहाणू व वाडा येथील ग्रामपंचायत हद्दीतील शाळांचा समावेश आहे. कोविड- १९ विषाणूच्या संसर्ग व प्रादुर्भावामुळे राज्यात रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच या आठवड्यात संपूर्ण पालघर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांवर पोहचला आहे. लहान मुलांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये व त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, म्हणून जिल्ह्यातील वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील पालघर व डहाणू नगर परिषद हद्दीतील, पालघर तालुक्यातील बोईसर, सरावली, खैरापाडा, कुंभवली, पाम, सालवड, पास्थळ, बेटेगाव, नवापूर, कोलवडे व मान ग्रामपंचायत हद्दीतील तसेच वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील सर्व माध्यमांच्या १ ली ते ५ वी पर्यंतच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT