मुंबई

भिवंडीत कोट्यवधी रुपयांचा बनावट

CD
भिवंडीत कोट्यवधी रुपयांचा बनावट कापड साठा जप्त भिवंडी, ता. ६ (बातमीदार) ः भिवंडी शहर परिसरात नामांकित कंपनीचे लेबल लावून कपडे विक्री करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. भिवंडी तालुक्यातील अंजूरफाटा भागातील एका गोदामात ‘सियाराम’ या सुप्रसिद्ध कपड्याच्या ब्रँडचे लोगो वापरून बनावट कपडे विक्री करण्यासाठी साठवलेले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आपल्या विशेष पथकासह छापा मारून कॉपीराईट कायद्यांतर्गत कारवाई केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला आहे. भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील अंजुरफाटा येथील धारणी आर्केड या ठिकाणी चौधरी टेक्सटाईल्स नावाने गोदाम आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणावर सियाराम या सुप्रसिद्ध कापड उत्पादक कंपनीच्या लेनीन या ब्रँडचे कपडे साठवल्याची माहिती इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन अँटीपायरसी सेलचे रामजित गुप्ता यांनी नारपोली पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ यांना सांगितली. बल्लाळ यांनी पोलिस पथकासह सकाळी गोदामावर छापा मारला. त्या ठिकाणी बनावट कपड्याच्या किनारीवर सियाराम लेनिन असे ब्रँडनेम लिहिलेले २६५ रुपये मीटरप्रमाणे विकले जाणारे एक कोटी एक लाख १७ हजार ४३५ रुपयांचे ३८ हजार १७९ मीटर कापड आढळून आले. हे कापड जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी गोदाम चालक जमाल अहमद कमरुद्दीन खान व गुरुचरण सतनाम सिंग या दोघांविरोधात फसवणूक व कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक बल्लाळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT