मुंबई

वाहतूकदारांनी हमालीचे पैसे घेण्याचा आग्रह केल्यास गुन्हे दाखल करा

CD
हमालीसाठी पैसे मागितल्यास वाहतूकदारांवर गुन्हे दाखल करा कामगार आयुक्तांचे आदेश; अंतिम निर्णय प्रलंबित सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ६ : वाहतूकदारांनी वाहनचालक-मालकांकडून हमालीचे पैसे घेऊ नये, अशी मागणी कामगार आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे लोडिंग-अनलोडिंग, वाराई आणि मराईची रक्कम वाहनचालक व मालक यांच्याकडून वसूल करण्याचा आग्रह कोणी करत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या तात्पुरत्या सूचना मुंबईतील कामगार आयुक्तालयाने दिल्या आहेत; मात्र अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नसल्याचे कामगार आयुक्त रमेश जाधव यांनी सांगितले. माल भरताना आणि उतरवताना वाहतूकदारांनी हमालीचे पैसे द्यायचे, असा पारंपरिक निर्णय आहे; मात्र मोटार मालक कामगार वाहतूक संघटनांकडून ज्यांचा माल त्यांनीच हमालीचे पैसे देण्याची मागणी केली आहे. त्यावर सध्या कामगार आयुक्त कार्यालयाने तात्पुरता निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या तरी वाहतूकदारांना हमालीचे पैसे देण्याची गरज नाही. ते पैशांचा आग्रह करत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याने वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील सर्व वाहतूकदार संघटनेचे अथक प्रयत्न फळाला आले आहेत. वाहतूकदारांना हमालीमुक्त करण्यासाठी कामगार आयुक्तांकडून निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा, तालुका पातळीवरील २०१६ च्या परिपत्रकानुसार अंमलबजावणी करण्यात यावी व त्याचा अहवाल कामगार आयुक्तांना पाठवण्यात यावा, असे आदेश असल्याने वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे, असे राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले. --- वाहतूकदारांची कामगार विभागाकडे मागणी केली होती. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. - रमेश जाधव, कामगार आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

SCROLL FOR NEXT