मुंबई

आॅनलाईन खरेदीत ४ लाखांची फसवणूक

CD
आॅनलाईन खरेदीत ४ लाखांची फसवणूक स्वस्त कॅमेरा, घड्याळ मिळवणे पडले महागात सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता.६ ः मुंबईच्या कफ परेड भागात राहणाऱ्या केतन तांडेल या डेस्कटॉप इंजिनीयरला फेसबुकवरील जाहिरात पाहून एक कॅमेरा आणि घड्याळ आॅनलाईन खरेदी करणे चांगलेच महागात पडले. या दोन वस्तू खरेदी करण्याच्या नादात केतन यांना एका व्यक्तीने चार लाख ४३ हजारांना गंडा घातला. केतन यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर असलेल्या सॅम्युअल मार्क नावाच्या प्रोफाईलवर एक गो प्रो कॅमेरा आणि वन प्लस कंपनीच्या एका घड्याळाची जाहिरात पाहिली. त्यांची किंमत मार्केटपेक्षा कमी म्हणजेच कॅमेराची २५ हजार, तर घड्याळाची नऊ हजार इतकी होती. दोन्ही वस्तू आवडल्याने केतन यांनी संपर्क साधला. नंतर सॅम्युअल मार्क नावाच्या माणसाने केतनला व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. केतन यांनी दोन्ही वस्तू बुक केल्या. त्यानंतर सॅम्युअल नावाच्या व्यक्तीने वेगवेगळी कारणे सांगत दोन महिन्यांत चार लाख ४३ हजार रुपये वेगवेगळ्या बँक अकाऊंटवर ट्रान्सफर करून घेतले. एवढे पैसे घेऊनही केतन यांना एकही वस्तू मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादंविच्या कलम ४१९, ४२० आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणांना आजपासून मिळणार १५०० रुपये; फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!

Jaykumar Rawal Photo Viral : व्हॉट्सॲपवर फोटो फॉरवर्ड करताना शंभर वेळा विचार करा! पणनमंत्र्यांचा मॉर्फ फोटो व्हायरल, धुळ्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SIP Investment: 1 एप्रिलपासून गुंतवणूक सुरू करायची? SIP ठरू शकते तुमची सर्वात मोठी गेमचेंजर! कशी ते समजून घ्या सोप्या शब्दांत

'तिचे केस किती आकर्षक...' प्रियकराकडून मैत्रिणीच्या केसांची स्तुती; प्रेयसी संतापली, संतापजनक घटनेनं मुंबई हादरली

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

SCROLL FOR NEXT