मुंबई

शिक्षकांच्या त्या प्रमाणपत्राची पात्रता दुसऱ्या विभागाच्या समितीकडून तपासा

CD
प्रमाणपत्रांची पडताळणी दुसऱ्या विभागाकडून करा मराठी शाळा संस्थाचालक संघाच‍ी मागणी मुंबई, ता. ७ : २०१३ नंतर राज्यातील विविध शाळांमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांच्या शिक्षक पात्रता प्रमाणपत्राची पडताळणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून केली जाणार आहे. यासाठी नुकतीच एक समिती गठित करण्यात आली असून त्याला मराठी शाळा संस्थाचालक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. ज्या परिषदेकडून शिक्षक पात्रता प्रमाणपत्र देण्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला, त्यांच्याकडूनच या प्रमाणपत्राची पडताळणी केल्यास त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यामुळे या प्रमाणपत्रांची पडताळणी ही इतर विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमणूक केली जावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. राज्यातील विविध शाळांवर १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रुजू झालेल्या राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याने अनेक शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांचे हे प्रमाणपत्र जलदगतीने म्हणजे ७ जानेवारी २०२२ पर्यंत तपासणीचे आदेश दिले असल्याने यात प्रचंड मोठ्या प्रमाणात अनागोंदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या समितीऐवजी हे प्रमाणपत्र इतर विभागाची समिती स्थापन करून त्याची पडताळणी केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT