मुंबई

स्वतंत्र खोली असेल तरच गृहविलगीकरण

CD
स्वतंत्र खोली असेल तरच गृहविलगीकरण मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ७ : घरात विलगीकरणासाठी स्वतंत्र खोली असेल तरच लक्षणविरहीत कोविडबाधितांना गृहविलगीकरणात राहता येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन व्याधी असलेल्यांना पडताळणी करूनच गृहविलगीकरणाची परवानगी मिळणार आहे. प्रसूतीसाठी दोन आठवड्यांचा कालावधी असलेल्या गरोदर महिला, एचआयव्हीबाधित, कर्करोगग्रस्तांना गृहविलगीकरणाची परवानगी मिळणार नाही, असा निर्णय महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी (ता. ६) जाहीर केला आहे. कोविडसदृश्‍य लक्षणे नसलेले अथवा सौम्य लक्षणं असलेल्या व्यक्ती ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९३ टक्क्यांपेक्षा कमी नसेल, अशांनाच गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र, त्यांनी घरातील इतर व्यक्तींपासून वेगळे राहायचे आहे. घरात स्वतंत्र राहण्याची सोय नसल्यास अशा व्यक्तींना पालिकेच्या विलगीकरण केंद्रात राहावे लागणार आहे. गृहविलगीकरणात असताना सौम्य लक्षणबांधितांना चार औषधांच्या डोसमध्ये ताप न उतरल्यास संबंधितांनी तात्काळ डॉक्टरांना माहिती द्यावी. तसेच स्वत: औषधे ठरवून न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. स्टराईडसारखी औषधे टाळण्यात यावीत आणि संबंधित व्यक्तीची नियमित तपासणी करून त्याबाबत नोंद ठेवणेही बंधनकारक असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. चौकट सीटी स्कॅन, रक्त चाचणीची घाई नको गृहविलगीकरणात असलेल्यांनी सीटी स्कॅन, रक्त चाचणीबाबत स्वत: निर्णय घेऊ नये. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या चाचण्या करण्यात याव्यात. तीन मास्क बंधनकारक बाधित आणि त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने त्रिस्तरीय मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच मास्क, टिश्‍यू पेपर, ग्लोज, तसेच बाधित व्यक्तीच्या वापरातील इतर वस्तू थेट कचऱ्यात न टाकता ते किमान ७२ तास कागदी पिशवीत ठेवाव्यात. नंतरच्या कचरऱ्यात टाकाव्यात. यासाठी पिवळ्या पिशवीचा वापर करावा. सात दिवसांत सुटका गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी सलग तीन दिवस ताप नसल्यात सात दिवस विलगीकरणात राहायचे आहे. त्यासाठी चाचणी करण्याची गरज नाही; तर निकटच्या संपर्कातील व्यक्तींनीही सात दिवसांत स्वतंत्र राहायचे असून पाचव्या आणि सातव्या दिवशी कोविड चाचणी करावी. ही लक्षणे आढळल्यास पालिकेला कळवा - सलग तीन दिवस १०० फॅरनाईडपेक्षा जास्त ताप. - प्राणवायूची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी. - श्‍वास घेण्यास त्रास. - छातीत दुखणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

SCROLL FOR NEXT