murder sakal media
मुंबई

मुंबई : पोलीस हवालदाराची खलबत्याने ठेचून हत्या

कोळसेवाडी पोलिसांनी केली पत्नी व मुलीला अटक

CD

डोंबिवली : एका व्यक्तीची पत्नी आणि मुलीनेच खलबत्याच्या दांड्याने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश बोरसे (Police prakash borse murder) असे मयताचे नाव असून ही व्यक्ती मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) पोलिस हवालदार म्हणून कार्यरत होती. घरगुती वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती असून याप्रकरणी पत्नी व मुलीविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात (kolsewadi police station) गुन्हा दाखल (police fir) करण्यात आला आहे. (police prakash borse killed by wife and daughter police fir in kolsewadi police station)

पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे पोलिस निरीक्षक सुनील गवळी करीत आहेत. कल्याण पूर्वेतील पावशेनगर परिसरात प्रकाश बोरसे हे कुटुंबासह राहत होते. कुर्ला पोलिस ठाण्यात ते पोलिस हवालदार या पदावर कार्यरत होते. प्रकाश यांची मुलगी भाग्यश्री बोरसे (लग्नानंतरचे नाव भाग्यश्री योगेश पवार) हिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते; पण ती पतीसोबत न राहता माहेरी राहत होती. यावरून घरात वाद होत असत.

गुरुवारी रात्री पुन्हा घरगुती वाद झाला आणि या रागाच्या भरात पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री हिने खलबत्त्याच्या दांडक्याने ठेचून प्रकाश यांची हत्या केली. हत्येनंतर दोघीही घरातच बसून होत्या. या घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बसीर शेख यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस पथक घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता घरात प्रकाश हे मृतावस्थेत आढळून आले.

मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालय येथे उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ज्योती बोरसे व भाग्यश्री बोरसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघींना अटक करण्यात आली आहे. त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती तपास अधिकारी गुन्हे पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT