मुंबई

पोलीसा मध्येही वाढतायेत कोरोनाचे रुग्ण

CD
पोलिसांमध्येही वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण आयुक्तालय क्षेत्रात अधिकारी आणि कर्मचारी करोनाबाधित विरार, ता. ७ (बातमीदार) ः वसई विरार आणि मिरा भाईंदर शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख पुन्हा वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या कचाट्यात पोलिस कर्मचारीही अडकत चालले आहेत. कर्तव्यावर असलेले १८ अधिकारी आणि ५५ कर्मचारी मिरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलिस आयुक्तालयात आढळून आले आहेत. वस‌ई विरारमधील वालीव, आचोळे, तुळिंज, विरार, पेल्हार, अर्नाळा व माणिकपूर, पोलिस ठाण्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे; तर मिरा भाईंदरमधील मिरा रोड, काशीमिरा, नयानगर, भाईंदर या पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. सुरक्षा शाखा, आर.सी.पी. पथक, वाहतूक विभाग, परिमंडळ कार्यालय, नियंत्रण कक्ष येथेही पोलिसांना कोरोना संसर्ग झाला असल्याने सक्तीच्या रजेवर जावे लागले आहे. त्यातच ५५ वर्षांवरील आजारी पोलिसांना घरून काम करण्यास सांगितल्याने कायदा सुव्यवस्था कशी राखायची, असा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे. राज्यभरात ओमिक्रॉन विषाणू पसरण्यास सुरुवात झाली आहे. वसई-विरार महापालिकेच्या परिसरातदेखील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वसई विरार पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार काल पालिका हद्दीत ९०१ रुग्ण आढळून आले आहेत; तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात शासनाकडून दिलेले कोरोना निर्बंधाचे नियम पाळले जावेत, यासाठी सातत्याने पोलिस नागरिकांच्या सहवासात येत आहेत. यामुळे त्यांना बाधा झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT