मुंबई

नाशिकमधून पळवलेली मुलगी घाटकोपरमध्ये सापडली

CD
नाशिकमधून पळवलेली मुलगी घाटकोपरमध्ये सापडली घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) ः नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील किल्ला पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पळवून मुंबईत आणलेली मुलगी अखेर घाटकोपरच्या जुन्या रमाबाई सहकारनगरात सापडली. पंतनगर पोलिसांनी तिच्यासह तिला पळवून आणणाऱ्यासही ताब्यात घेतले आहे. या मुलीला पळवून नेण्यात आल्याची तक्रार मुलीच्या आईने किल्ला पोलिस ठाण्यात केली होती. त्यामुळे तेथील पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी आणि अपहृत झालेल्या मुलीचे लोकेशन मुंबईत तपासण्याची विनंती मुंबई पोलिसांना केली होती. त्यामुळे पंतनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर या मुलीचे आणि तिला पळवलेल्या व्यक्तीचे लोकेशन कामराजनगर परिसरातील जुने रमाबाई सहकारनगर असल्याचे आढळले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन नंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी किल्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT