मुंबई

मालवणीतील रस्ता मोकळा होणार

CD
मालवणीतील रस्ता मोकळा होणार सहा इंची जलवाहिनीला मंजुरी मालाड, ता. ८ (बातमीदार) ः मालवणी गेट क्रमांक तीन येथील रस्ता लवकरच मोकळा होणार आहे. सहा इंची जलवाहिनी मंजूर झाल्याने शेकडो जलवाहिन्यांमुळे नाहीसा झालेला रस्ता आता चालण्याजोगा होणार आहे. हा एकमेव रस्ता असल्याने रशीद खान कम्पाऊंड, पटेल कम्पाऊंड, बाबू भाई चाळ, एकता चाळ, पंजाबी चाळ, गुजराती चाळ, झोडीएक सोसायटी, शोभावती कॉटेज, गोन्साल्विस कम्पाऊंड, रोझरिओ कॉलनी, तसेच अली तलाव परिसरापर्यंत जवळजवळ ५ ते ६ हजार लोकवस्तीला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या सहा इंची जलवाहिनीमुळे सव्वाशे-दीडशे जलवाहिन्या हटवण्यात येणार असून त्या ठिकाणी खाली असलेले गटारही दुरुस्त करण्यात येणार आहे. स्थानिकांनी मुंबईचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार अस्लम शेख यांना एक वर्षाआधी पत्र देऊन मागणी केली होती. तसेच १६ मार्च २०२१ ला अस्लम शेख यांनी पालिकेला पत्र लिहून या ठिकाणी सहा इंची जलवाहिनी बसवण्यास सांगितले होते. ७ जानेवारी रोजी पालिका पी उत्तर विभागातील जलखात्याचे कनिष्ठ अभियंता व त्यांच्यासोबत काही अधिकारी यांनी जागेची पाहणी व मोजमाप करत दोन-तीन दिवसांत काम सुरू होणार असे सांगितल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT