मुंबई

धारावीतील निराधार वृद्धाला अखेर आधार मिळाला

CD
धारावीतील निराधार वृद्धाला अखेर आधार मिळाला सविता सदाफुलेंच्या प्रयत्नांना यश धारावी, ता. ८ (बातमीदार) : धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना एका गरीब निराधार आंधळ्यासोबत घडलेल्या घटनेने धारावीकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक शौचालयात खितपत पडलेल्या निराधार वृद्ध अंध गरिबाला आश्रमात सोडण्यासाठी दाहीदिशा एक करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या सविता सदाफुले यांची सध्या धारावीत चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निराधार अंध धारावीतील शास्त्रीनगर परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात वास्तव्य करत होता. कोणी काही खाण्यास दिले तर ते खाऊन नाहीतर उपाशीपोटी शौचालयात पडून होता. तो स्थानिक रहिवासी असूनसुद्धा येथील रहिवासी त्याच्याकडे कानाडोळा करत होते. यामुळे तो पार खचून गेला होता. शरीरात ताकद असेपर्यंत त्याने भिक मागून आपला उदरनिर्वाह कसाबसा चालविला. मात्र वयोमान वाढल्याने तो हतबल झाला. चालणेही अवघड होऊन बसल्याने त्याची उपासमार होऊ लागली, परिणामी त्याची प्रकृती आणखीनच खालावली. शौचालयाच्या कोपऱ्यात अखेरची घटका मोजत तो निपचित पडला होता. सविता यांचे त्याच्याकडे लक्ष गेल्यावर त्यांनी वृद्धाबाबत माहिती घेतली. धारावीतील काही सामाजिक संस्थांकडे धाव घेतली, परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली. मात्र मनाशी दृढ निश्चय केलेल्या सविता यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. ... ‘अरुणोदय’कडून मदत अलीकडे राजीव गांधीनगरमधील अरुणोदय फाऊंडेशनने मदतीचा हात दिला. नुकतेच या निराधार वृद्धाला फाऊंडेशन व धारावी पोलिसांच्या मदतीने त्याची कोरोना चाचणी करून कर्जत येथील ग्रेट फाऊंडेशन चिंबूर नावाच्या आश्रमात हलविण्यात आले. या घटनेमुळे समाजभान दाखविणाऱ्या सविता सदाफुले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT