मुंबई

ठाण्यात एकाच ठिकाणी मिळतोय तब्बल १६ चवींच्या चहा

CD
ठाणेकर तरुणांची कुल्लडमधील चहाला पसंती ठाणे, ता. ८ (बातमीदार) ः जगभरात पाण्यानंतर सर्वाधिक पिले जाणारे पेय म्हणजे चहा. याच गरमागरम आणि स्वादिष्ट पेयाने अनेक चहा प्रेमींच्या दिवसाची सुरुवात होते. चहाला वेळ नसते मात्र वेळेला चहा लागतो असे अनेकजण गंमतीने म्हणतात. सामान्यपणे आल्याची चहा, मसाला चहा, वेलची चहा, गवती चहा याच काही ठराविक चवींच्या चहा सर्वत्र मिळतात. मात्र ठाणे शहरातील ‘चाय सुट्टा बार’ या विशेषतः चहासाठी लोकप्रिय असणाऱ्या कॅफेमध्ये कॅफेमध्ये तब्बल १६ चवींचा चहा उपलब्ध आहेत. चहाप्रेमींना येथे विविध चवींच्या चहांची चव मातीच्या कुल्लडमध्ये चाखता येत असल्याने कमी कालावधीतच ‘चाय सुट्टा बार’ हे चहाप्रेमींचे आवडते ठिकाण बनले आहे. खरंतर ‘चाय सुट्टा बार’ ही संकल्पना इंदोर येथील तीन युवकांची असून, २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात याची एक शाखा प्रशांत सावंत यांनी ठाणे शहरात सुरू केली. ठाणे शहरातील मासुंदा तलावाच्या किनारी असणाऱ्या या कॅफेत दिवसभर विविध चवींचा फक्कड चहाचा आस्वाद घेण्यासाठी तरुण, ज्येष्ठ, चाकरमानी, मित्रमंडळी आवर्जून येत असतात. आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठ्या अशा मातीच्या कुल्लडमध्ये दिला जाणारा चहा ही खऱ्या अर्थाने ‘चाय सुट्टा बार’ ची विशेष बाब आहे. याठिकाणी पहाडी चहा, केसर इलायची चहा, पान चहा, रोझ चहा, चॉकलेट चहा, उकाळा, आल्याची चहा, अद्रक इलायची चहा, मसाला चहा, गुळाचा चहा इत्यादी चवींचे चहा चाखायला मिळतात. हर्बल टी मध्ये ग्रीन टी, काश्मिरी कावा टी, लेमन टी, पाईनॅपल टी असे अशा अनेक चवींचे चहा उपलब्ध आहेत. ‘चाय सुट्टा बार’ येथे मिळणाऱ्या चहांमध्ये कोणत्याही प्रकारचे फ्लेवर इसेन्स न टाकता त्या त्या चवींचा चहा पत्तीचा वापर चहा बनवण्यासाठी केला जातो. चहा सोबतच हे ठिकाण निरनिराळ्या चवींच्या कॉफी, मिल्कशेक, पिझा इत्यादींसाठी ही लोकप्रिय आहे. चहाची टपरी, लहान-मोठी दुकाने इत्यादी ठिकाणी काही ठराविक चवींचा चहा उपलब्ध असतो; परंतु ठाण्यातील चहाप्रेमींना कुल्लडमध्ये चहाच्या निरनिराळ्या चवींचा आस्वाद घेता यावा याकरता ‘चाय सुट्टा बार’ हा कॅफे सुरू केला. पुढील महिन्यात अजून काही वेगळ्या चवींच्या चहा ग्राहकांसाठी आणण्याचा प्रयत्न आहे. - प्रशांत सावंत, मालक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT