Omicron Variant  esakal
मुंबई

ठाणे जिल्ह्यावर ओमिक्रोनचे संकट गडद

५४ ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद सर्वाधिक ३६ रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रात

CD

ठाणे : मागील एक ते दीड महिन्यापासून ओमिक्रॉनचे रुग्ण (omicron patients) आढळून येण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत ठाणे (thane) जिल्ह्यात २६ हजार ६३२ नागरिक परदेशातून आले असून त्यापैकी ५४ नागरिकांचे ओमिक्रॉन अहवाल पॉझिटीव्ह (omicron report positive) आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३६ रुग्ण हे ठाणे महापलिका क्षेत्रातील आहेत. ठाणे जिल्ह्यावरील ओमिक्रॉनचे संकट गडद होत असल्याचे दिसून आले. (omicron patients increases in thane district)

मुंबई शहरानंतर ठाणे जिल्ह्यात देखील ओमिक्रॉनने आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळून आला. यानंतर परदेशातून येणाऱ्या नागरिकांबाबत जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत, विदेश यात्रेवरून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ओमिक्रॉनचे रुग्ण देखील वाढत आहेत.

त्यानुसार मागील महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात परदेशातून २६,६३२ नागरिक आले आहेत. त्यापैकी १६ हजार २११ नागरिकांचा शोध घेण्यात आरोग्य विभागाला यश आले असून १२ हजार ८७५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १२५ जणांचे नमुने डब्ल्यूजीएस चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातून ५४ जणांचे अहवाल हे ओमिक्रॉन पॉझिटीव्ह आले. दरम्यान, ओमिक्रॉनचे सर्वाधिक ३६ रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रात आहेत. त्यामुळे ठाणे पालिका प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिक वाढला असून पालिका प्रशासन देखील अधिक सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील ओमिक्रॉनचे रुग्ण ठाणे शहर- ३६ नवी मुंबई - ८ कल्याण, डोंबिवली- ७ उल्हासनगर- ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT