मुंबई

छकडा एक्सप्रेसचा टीझर पाहून अनुष्काला केले ट्रोल

CD
छकडा एक्स्प्रेसचा टीझर पाहून अनुष्काला केले ट्रोल बॉलीवूडची क्युट अभिनेत्री अनुष्का शर्मा बराच काळ पडद्यापासून लांब होती; मात्र आता अनुष्का एका वेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनुष्काने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘छकडा एक्स्प्रेस’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट टीमच्या माजी कर्णधार झुलन गोस्वामीवर आधारित आहे. अनुष्काने या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अनुष्काच्या हातात बॅट असून ती क्रिकेटच्या मैदानात आहे. यासोबतच झुलन गोस्वामी यांचा संपूर्ण प्रवास यामध्ये दाखवणार असल्याचे टीझरमध्ये दिसत आहे. हा टीझर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे; तर काही नेटकऱ्यांनी यावरून तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी तिला ट्रोल करताना म्हणाले, ‘उंची सारखी नाही. रंग सारखा नाही. बंगाली बोलण्याची पद्धत सारखी नाही. अनुष्का या व्हिडीओत झुलन गोस्वामी सोडून सगळं दिसते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हा चित्रपट फ्लॉप ठरणार. हिच्या जागी झुलनला घेतलं असतं, तरी चाललं असतं. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अनुष्काला ट्रोल केलं आहे. ...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT