मुंबई

वाहतूक पोलिसांविरोधीतील आरोपांची चौकशी सुरू

CD
वाहतूक पोलिसांविरोधातील आरोपांची चौकशी सुरू राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती मुंबई, ता. ८ : नियमबाह्य पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांना उचलून नेताना वाहतूक पोलिस चालकांकडून गैरप्रकारे पैसे उकळत असल्याच्या आरोपांबाबत चौकशी सुरू केल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. तसेच याचिकेत ठाणे आणि नवी मुंबई पोलिस आयुक्तांना प्रतिवादी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नारपोली, माणकोली, कळवा, खारेगाव, मुंब्रा टोलनाका, कल्याण फाटा, कापूरबावडी, माजिवडा, पनवेल, महापे, कळंबोली आणि तळोजा येथे टोईंग शुल्काच्या वसुलीखाली ट्रकचालकांकडून जादा पैसे वसूल केले जात आहेत, असा आरोप याचिकेत केला आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब, कर्नाटक अशा विविध राज्यांतून येथे वाहनांची ये-जा होत असते. त्यांच्याकडून संरक्षण शुल्क या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील टोके यांनी ॲड. प्रदीप हावनूर यांच्यामार्फत याचिका केली आहे. ... ‘दोषींवर कारवाई करू’ शुक्रवारी न्या अमजद सय्यद आणि न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेत उपस्थित आरोपांची दखल सरकारने घेतली असून चौकशी सुरू केली आहे. यात दोषी आढळलेल्या पोलिसांवर कारवाई केली जाईल, अशी हमी सरकारी वकील ए. आर. पाटील यांनी दिली. राज्य सरकारने तीन आठवड्यांत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावे; ठाणे, नवी मुंबई पोलिस आयुक्तांना प्रतिवादी करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. याचिकेवर चार आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT