मुंबई

कायमस्वरूपी पोलीस महासंचालक नियुक्त करा

CD
कायमस्वरूपी पोलिस महासंचालक नियुक्त करा उच्च न्यायालयात याचिका सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ८ : राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर कायमस्वरूपी पोलिस महासंचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे या पदाची तात्पुरती जबाबदारी आहे. संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. एप्रिल २०२१ पासून त्यांच्यावर राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, आता पांडे यांना या पदावरून हटविण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे ॲड. दत्ता माने यांनी केली आहे. पोलिस महासंचालक हे पद सर्वोच्च असून त्याच्या नियुक्तीची कायदेशीर प्रक्रिया असते. यानुसार राज्यातील दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली जातात. त्यातून अंतिम नावांची शिफारस महासंचालक पदासाठी केली जाते. त्यातून पूर्णवेळ महासंचालक नियुक्ती केली जाते. ही प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. यातील अंतिम तीन पोलिस अधिकाऱ्यांमध्ये हेमंत नागराळे, के. व्यंकटेशम आणि रजनीश सेठ यांचा समावेश आहे, असे याचिकेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या तीन अधिकाऱ्यांमधून एकाची या पदावर नियुक्ती करावी, अशी मागणी माने यांनी केली आहे. सध्या असलेले हंगामी महासंचालक पांडे यांना कायम करण्यासाठीही एक प्रक्रिया आहे, असा दावाही यात करण्यात आला आहे. याचिकेवर लवकरच न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT