मुंबई

वालधुनी संवर्धनासाठी शासकीय यंत्रणा एकवटल्या

CD
वालधुनीच्या संवर्धनासाठी यंत्रणा एकवटल्या प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनांसाठी बैठक अंबरनाथ, ता. ८ (बातमीदार)ः वालधुनी नदीमधील प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका प्रशासन, एमआयडीसी अशा सरकारी यंत्रणा एकवटल्या आहेत. या मुद्द्यावर नुकतीच या सरकारी यंत्रणांची बैठक नगरपालिकेमध्ये पार पडली. वालधुनी नदी रासायनिक प्रदूषणामुळे प्रदूषित झाली आहे. याच अनुषंगाने अंबरनाथ पालिकेत झालेल्या शासकीय यंत्रणांच्या बैठकीत नदी संवर्धनासाठी उपाययोजना आखण्यावर चर्चा करण्यात आली. अंबरनाथ शहराजवळून उगम पावणारी वालधुनी नदी अंबरनाथ एमआयडीसी आणि पुढे अंबरनाथ शहरातून उल्हासनगर शहरात वाहत जाते; मात्र अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वनशक्ती संस्थेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने स्थानिक स्वराज्य संस्थांसह एमआयडीसीला दंड ठोठावला होता. यातून या नदीचे पुनरुज्जीवीकरण केले जाणार होते; मात्र त्यानंतरही नदीत रसायने सोडण्याचे प्रकार सुरूच राहिले. या सगळ्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कंपन्यांवर काहीही कारवाई करत नव्हते. त्यामुळे वालधुनी नदीबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी अंबरनाथ पालिकेत शासकीय यंत्रणांची बैठक पार पडली. या बैठकीत अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी शंकर वाघमारे, एमआयडीसीचे अधिकारी, अंबरनाथ पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT