मुंबई

वक्फ बोर्डाची व सिडकोची फसवणूक करणाऱयांविरोधात गुन्हा दाखल

CD
फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल कब्रस्तान जमिनीच्या मालकीवरून सुन्नी कोकणी मुस्लिम ट्रस्टने केली होती तक्रार नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : जमीन लाटण्यासाठी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे खोटी कागदपत्रे सादर केली म्हणून खैरणे येथील १९ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरणे गावात कब्रस्तानासाठी आरक्षित असलेल्या जमिनीचे खोटे दस्तऐवज महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे सादर करण्यात आले आहेत. कब्रस्तानचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ट्रस्टने महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे, तसेच कोपरखैरणे पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी वक्फ बोर्डाची व सुन्नी कोकणी मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. खैरणे गावात असलेल्या कब्रस्तानच्या जमिनीपैकी सर्वे नं. १९०/१ ही जमीन पूर्वी बद्रुद्दीन पटेल यांच्या नावे होती. त्यांच्या मृत्यूनंतर १९५२ मध्ये ही जमीन वारसाहक्काने त्यांची मुले अहमद पटेल, युसूफ पटेल व लतीफ पटेल यांच्या नावाने झाली होती. सर्वे क्र. १९०/१ मध्ये एकूण ५१ गुंठे जमीन आहे. ही जमीन १९७० मध्ये सिडकोने संपादित केल्यानंतर १९८२ मध्ये सिडकोने त्यातील ३० गुंठे जागा मुस्लिम कब्रस्तानासाठी आरक्षित केली. त्यानंतर १९९२ मध्ये अहमद पटेल, युसूफ पटेल व लतीफ पटेल यांना ५१ गुंठे जमिनीपैकी ३१ गुंठे जमिनीचे पैसे दिले. उर्वरित २० गुंठे जमिनीवर पूर्वीपासूनच कब्रस्तान असल्यामुळे त्याचे पैसे सरकारजमा केले. त्यानंतर सिडकोने पटेल कुटुंबाला १९९९ मध्ये संपादित केलेल्या ५१ गुंठे जमिनीचा साडेबारा टक्के योजने अंतर्गत सेक्टर-१२ बी मध्ये भूखंडाच्या स्वरूपात मोबदला देखील दिला. खैरणे गावातील ग्रामस्थांनी २०१८ मध्ये ३० गुंठे जमिनीवर असलेल्या कब्रस्तानाची देखरेख व व्यवस्थापन करण्यासाठी सुन्नी कोकणी मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टची स्थापना केली. त्याची रितसर नोंदणी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे केली. पण मृत बद्रुद्दीन पटेल व त्यांच्या वारसदारांनी सर्वे नं. १९०/१ या जमिनीचे मालक असल्याचे तसेच सदरची जमीन त्यांच्या ताब्यात असल्याची खोटी माहिती वक्फ बोर्डाला दिली. तसेच, कब्रस्तानाचे नियमन व देखरेख करण्यासाठी बद्रुद्दीन पटेल सुन्नी मुस्लिम कब्रस्तान या नावाने व्यवस्थापकीय समितीची नोंदणी करण्यासाठी ऑक्टोबर २०१९ मध्ये वक्फ बोर्डाकडे वक्फ डिड, शपथपत्र आदी कागदपत्रे सादर केली. --------------------------------- खोटे दस्तऐवज सादर कब्रस्तानावर मूळ जमीनमालकांनी दावा केल्याने डिसेंबर २०२१ मध्ये औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ ट्रिब्युनलने सदर सुन्नी कोकणी मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टला नोटीस पाठवून त्यावर त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले. त्यानंतर ही जमीन सिडकोच्या मालकीची असताना देखील पटेल यांच्या वारसदारांनी जमिनीचे मालक असल्याचे शपथेवर खोटे सांगितल्याचे आढळून आले. जमीन हडप करण्याच्या उददेशाने खोटे दस्तऐवज तयार करून ते औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे सादर केल्याचे आढळून आले. --------------- यांच्यावर गुन्हे दाखल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये आरिफ युसूफ पटेल, शादाब लतीफ पटेल, रवीष अजीज पटेल, सलीम अहमद पटेल, शब्बीर अहमद पटेल, मुनीर युसूफ पटेल, अन्वर युसूफ पटेल, जाफर युसूफ पटेल, जाकीर युसूफ पटेल, एजाज युसूफ पटेल, आसिफ युसूफ पटेल, अशफाक युसूफ पटेल, समीर लतीफ पटेल, शहबाज लतीफ पटेल, गुलाम हुसैन फकी, इरफान शरिफ पटेल, अकबर मोहम्मद कडके, नाजीम अब्दुला पटेल, नईम हुसैनमिया पटेल या १९ व्यक्तींचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT