मुंबई

जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल गुरूवारी

CD
जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल गुरुवारी ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावाबाबत माहिती कळणार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ८ : मुंबईत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव वेगाने होत आहे. खबरदारी म्हणून उच्च जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांव्यतिरिक्त कोविडची लागण झालेल्या लोकांचे नमुने महापालिका जिनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवत आहे. मुंबईत आतापर्यंत ओमिक्रॉनचा किती प्रादुर्भाव झाला, याबाबत महापालिकेने केलेल्या आठव्या जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल गुरुवारी (ता. १३) येणार आहे. ओमिक्रोन विषाणू मुंबईत झपाट्याने पसरत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्याअनुषंगाने मुंबई महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, यापूर्वी ओमिक्रोनप्रभावित देशांतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करून त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात होते; मात्र आता कोविडबाधित मुंबईकर रुग्णांचे नमुनेही कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. २१ आणि २२ डिसेंबर २०२१ रोजी आढळलेल्या ३०० हून अधिक नमुन्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये ३७ टक्के नमुने म्हणजेच १४१ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. पालिकेने केलेल्या सातव्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये २८२ पैकी १५६ नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचे नमुने आढळले होते. --- सातव्या जिनोम सिक्वेन्सिंगवेळी २८२ नमुने तपासण्यात आले, त्यापैकी ८९ नमुन्यांमध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्ह, ३७ नमुन्यांमध्ये डेल्टा; तर १५६ नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले होते. आता आठव्या अहवालात मुंबईत ओमिक्रॉनचा किती प्रसार झाला, याबाबतची सविस्तर माहिती मिळेल. - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका --- सातव्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉनच्या १५६ रुग्णांपैकी केवळ सहा टक्के म्हणजे नऊ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठव्या अहवालात किती रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, याचा पुरावा शोधला जाईल. - डॉ. राहुल पंडित, सदस्य, कोविड टास्क फोर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT