मुंबई

अ थर्सडे चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित

CD
‘अ थर्सडे’ चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घातला असून, अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. अनेकांनी चित्रपटाच्या तारखा बदलल्या आहेत. आता चित्रपट प्रदर्शनासाठी निर्माते आपला मोर्चा ओटीटीकडे वळवत चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत आहेत. अभिनेत्री यामी गौतमचा ‘अ थर्सडे’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हॉटस्टारने या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे हक्क विकत घेतले आहेत. या चित्रपटात यामी गौतम, नेहा धुपिया, डिंपल कपाडिया आणि अतुल कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. बेहजाद खंबाटा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटाची कथा देखील लिहिली आहे. अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नसली तरीही येत्या दोन महिन्यांत चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात नयना जयस्वाल या एक बुद्धिमान शालेय शिक्षिकेची कथा असून नयना जयस्वाल ही भूमिका अभिनेत्री यामी गौतमने साकारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT