मुंबई

करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने संतप्त रुग्णांनी नर्सला केली धक्काबुक्की,

CD
पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची नर्सला धक्काबुक्की घणसोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : ॲन्टिजेन तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर दोन व्यक्तींनी रागाच्याभरात कोरोना तपासणी करणाऱ्या नर्सला धक्काबुक्की करून तिचा हात मुरगळल्याची घटना घणसोली नोसिल नाका येथील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. हिम बहादूर रोखा (३५) आणि सिकंदर सोहेल निषाद (३५) अशी दोघांची नावे असून रबाळे पोलिसांनी त्‍यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हिम बहादूर आणि सिकंदर निषाद हे दोन्ही घणसोलीतील नोसिल नाका परिसरात राहत असून ६ जानेवारी रोजी ते महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणीसाठी गेले होते. आरोग्य केंद्रातील संगीता कनोजिया या नर्सने दोघांची ॲन्टीजेन तपासणी करून त्यांना अहवाल येईपर्यंत बसण्यास सांगितले. थोड्या वेळानंतर या दोघांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नर्स संगीता कनोजिया हिने दोघांना त्याबाबतची माहिती देऊन पुढील उपचाराबाबत सूचना दिल्या. या गोष्टीचा राग आल्याने, दोघांनी नर्स संगीता कानौजिया सोबत हुज्जत घालून तिचा हात मुरगळला. तसेच तिला धक्का मारून शिवीगाळ करून पळ काढला. कनौजिया यांनी घटलेल्‍या प्रकाराची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याला दिली. त्यांनतर आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दोघांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनी फोन घेतले नाही. कानौजिया यांनी वरिष्ठ अधिकऱ्यांसोबत चर्चा करून रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हिम बहादूर आणि सिकंदर निषाद या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते? खरेदीला गेल्यावर पार्किंग कुठे करायचं? वाचा सविस्तर अपडेट्स

Viral Video: डीजेचा दणदणाट नव्हता, लेझीम-टिपरीचा जल्लोष होता; पाहा १९९१ मधील पुण्याची पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

SCROLL FOR NEXT