मुंबई

माथेरानमध्ये लॉकडाऊन नको

CD
माथेरानमध्ये लॉकडाऊन नको माजी नगराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना साकडे माथेरान, ता. ९ (बातमीदार) : दोन वेळा लॉकडाऊनचा तडाखा सहन केलेल्या माथेरानसाठी पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे हे शहर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. पर्यटनाच्या सुरक्षेची खबरदारी घेऊ, असे निवेदन माथेरानच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. माथेरानला दोन वर्षे कोरोनाचा त्रास सहन करावा लागला. गेल्या महिन्यात या शहराचे व्यवहार सुरळीत सुरू असताना कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा निर्बंध जाहीर करण्यात आले. ८ जानेवारीला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रसारित केलेल्या नवीन नियमावलीनुसार स्थानिक पर्यटक स्थळांविषयी काही निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे पर्यटकांवर आधारित असलेल्या माथेरानमधील नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे विशेष प्रशासकीय घटक म्हणून माथेरानचे पर्यटन सुरू ठेवावे यासाठी माथेरानच्या प्रेरणा सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. माथेरानचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा गटनेते प्रसाद सावंत यांनीही याबाबतचे निवेदन खासदार श्रीरंग बारणे यांना दिले. या वेळी कर्जतचे माजी नगरसेवक संतोष पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT