मुंबई

कोरोनाचा पोलिस दलात शिरकाव झाल्याने पोलिसांची धावपळ..

CD
कोरोनाचा पोलिस दलात शिरकाव झाल्याने सतर्कता भिवंडीत वाहतूक पोलिसांनी मास्क, सॅनिटायझर केले वाटप भिवंडी, ता. ९ (बातमीदार) ः भिवंडी शहर व ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना डेल्टाबरोबर ओमिक्रॉन व कोविड विषाणूची लागण मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. जनतेची सेवा करणारे पोलिस विशेषतः वाहतूक विभागात काम करीत असलेल्या पोलिसांना कोविडची बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क होऊ लागली आहे. यासाठी भिवंडी वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार यांच्या उपस्थितीत कोनगाव वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांनी पोलिस कर्मचारी व रिक्षाचालकांना जनजागृती करणारे पत्रक, मास्क व सॅनिटायझर वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर फलक लावून जनजागृती सुरू केली आहे. भिवंडी शहर परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बँक, महापालिका, पोलिस ठाणे आणि वाहतूक पोलिस प्रशासनासह सर्वच शासकीय कार्यालयांत बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस वर्धापनदिनाचे औचित्य साधून रिक्षाचालकांसह वाहतूक उपविभागात कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना सुमारे २५०० हून अधिक मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. जनजागृती पत्रकांचे वाटप सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार, पोलिस निरीक्षक गिरीष गोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT