मुंबई

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

CD
भिवंडीत प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या भिवंडी, ता. ९ ( बातमीदार ) ः अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला होता. मात्र, पोलिसांनी मृतदेहाचा अंगातील शर्टावरील टेलरच्या मार्कवरून मृतदेहाची ओळख पटवीत हत्या करणाऱ्या पत्नीसह प्रियकरास मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सलाउद्दीन मोहम्मद युसूफ ( वय ४२, रा. विठ्ठल नगर, भिवंडी) असे मृत पतीचे नाव आहे. भिवंडी तालुका पोलिस ठाण्याचा हद्दीत ४ जानेवारी रोजी खारबाव जंगलात एक व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या व चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाच्या शर्टावरील आयान फॉर मेन्स टेलर्स हा मार्क आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी भिवंडीत या नावाने टेलर्स दुकानाचा शोध घेतला असता शहरातील बागे फिरदोस येथे सदर दुकान आढळून आले, त्यानी याबाबत दुकानदाराचा मदतीने शर्टाची व त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असता तो मृतदेह सलाउद्दीन मोहम्मद युसूफ याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृतदेहाच्या कुटुंबीयांचा शोध घेत मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांकडून गोपणीय माहिती घेतली असता त्याच इमारतीमधील असजद अन्सारी ही व्यक्ती दफनविधीप्रसंगी नव्हती ही बाब समोर आली असता पोलिसांची संशयाची सुई त्याच्याकडे वळली त्याचा शोध घेत त्यास नारपोली परिसरातून ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. ...असा रचला कट असजद अन्सारी (वय ३२) या विवाहित व्यक्तीचे सलाउद्दीनच्या ३८ वर्षीय पत्नीसोबत मागील सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. त्यामध्ये पतीचा अडसर ठरत असल्याने पत्नी व प्रियकराने मिळून कट रचला. सलाउद्दीनला लघवीचा त्रास होत असल्याने खारबाव येथील ग्रामीण भागात त्यावर गावठी औषध मिळते ते घेण्यासाठी त्यास पत्नीने गळ घातली व त्यासाठी दोघे गेले असता त्या ठिकाणी आधीच येऊन थांबलेल्या प्रियकराने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

SCROLL FOR NEXT