मुंबई

तीन एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल

CD
माझगाव यार्डातील कामांमुळे तीन एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ९ : मध्य रेल्वेच्या माझगाव यार्ड येथे वॉशिंग पीट दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे एकूण तीन एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. १० जानेवारी ते २५ फेबुवारीदरम्यान एका द्वितीय श्रेणीचा आसन डबा कमी करून तीन एक्स्प्रेस धावणार आहेत. त्यामुळे कोकणातील आणि मराठवाड्यातील प्रवाशांना एक डबा कमी असल्याने गैरसोय होण्याची शक्यता आहे. मुंबई ते लातूर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२१०७) १० जानेवारीपासून ते २४ फेब्रुवारीपर्यंत आणि लातूर - मुंबई एक्स्प्रेस (२२१०८) ११ जानेवारीपासून ते २५ फेब्रुवारीपर्यंत एक द्वितीय श्रेणीचा आसन डबा कमी केला आहे. मुंबई ते बिदर एक्स्प्रेस (२२१४३) १२ जानेवारी ते २३ जानेवारीपर्यंत आणि बिदर ते मुंबई एक्स्प्रेस (२२१४४) १३ जानेवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत एक द्वितीय श्रेणीचा आसन डबा कमी केला आहे. दादर-सावंतवाडी रोड-दादर तुतारी एक्स्प्रेस (११००३/११००४) १० जानेवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत एक द्वितीय श्रेणीचा आसन डबा कमी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एकापेक्षा जास्त घरे घेणाऱ्यांना चाप बसणार, प्रशासन थेट कारवाई करणार; सरकारी योजनेतील घरांसाठी नवा नियम

रेकॉर्डवरच्या शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Buldhana road accident news: नांदुरा-जळगाव जामोद महामार्गावर दोन दुचाकींची भीषण धडक; २१ वर्षीय युवक ठार, तिघे गंभीर जखमी

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

नाना पाटेकर गावात एकटे राहतात तरी कसे? म्हणाले- फार्महाउसवर गाय- बैल आहेत, सकाळचा नाश्ता झाला की...

SCROLL FOR NEXT