मुंबई

गोदामातील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

CD
गोदामात गर्दी करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना दंड सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ९ : कोरोना प्रतिबंधक नियमांच्या पार्श्वभूमीवर परळ येथील ‘झेप्टो ऑनलाईन’च्या ऑर्डरच्या गोदामात होणाऱ्या गर्दीबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली. पाहणी करून गोदामातील कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ‘एफ’ दक्षिण विभागातील परळ परिसरात असलेल्या झेप्टो ऑनलाईन ऑर्डरच्या गोदामातून मुंबई आणि नजीकच्या परिसरात वस्तू पोहोचवल्या जातात. यासाठी वेगवेगळ्या विभागांतून शेकडो तरुण परळ येथील गोदामात येतात. यामुळे गोदामाबाहेर गर्दी होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून वारंवार करण्यात आल्या. स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी पोलिस तसेच पालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पालिका आणि पोलिस अधिकारी यांनी गोदामाची पाहणी केली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेत गोदामाच्या सुमारे ६० कर्मचाऱ्यांकडून दंड वसूल केला. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा दणका! विशेष मोहिमेत २ कोटींचा साठा जप्त, १६ जणांना अटक

Niger Airport Attack : आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला; ११ सैनिकांसह ३५ जण ठार; सुरक्षा दलाकडून २२ दहशतवाद्यांना कंठस्नान

Yeola Bribery Case : 60 हजार घेऊनही पोट भरले नाही! येवल्यात मुख्य लिपिक सुधीर वाघ लाचलुचपतच्या जाळ्यात, 5 हजार घेताना अटक, सावकारी परवान्यासाठी मागितली लाच

Viral Video: 'माझ्या गालावर पप्पी दे...' ; परदेशी पर्यटकाला रस्त्यात अडवलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद

'वेलकम टू द जंगल'सिनेमातील 'हे' गाणं ऐकलं का? अमृता फडणवीस यांच्या आवाजाची चर्चा; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT