मुंबई

नव्या रुग्णांचा आकडा स्थिर

CD
नव्या रुग्णांचा आकडा स्थिर सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ९ : तीन दिवसांपासून मुंबईत २० हजाराच्या आसपास रुग्ण सापडत असून रुग्णसंख्या स्थिरावल्याचे दिसते. आज १९,४७४ नवीन रुग्णांची भर पडली. त्यापैकी १५,९६९ (८२ टक्के) रुग्ण लक्षणेविरहित आहेत. नवीन रुग्णांपैकी १२४० रुग्णांना (६.३६ टक्के) रुग्णालयात दाखल करण्यात आले; तर आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ७४३२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर वाढून १.६६ टक्के झाला आहे; तर रुग्णदुपटीचा दरही ४१ दिवसांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत दैनंदिन बाधित रुग्ण वाढत असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा आज १,१७,४३७ वर पोचला आहे. मुंबईत रुग्ण दगावण्याचे प्रमाण किंचित वाढले असून आज सात रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांचा आकडा १६,४०६ वर पोचला आहे. आज ६८,२४९ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत १,४२,०३,८०५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज ८०६३ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत ७,७८,११९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज सापडलेल्या बाधित रुग्णांपैकी ११८ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ३०३५ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत ९,१४,५७२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ६,२१,७५० (६७.९८ टक्के) रुग्ण लक्षणेविरहित आहेत. एकूण उपलब्ध रुग्णशय्यांपैकी २१.३ टक्के रुग्णशय्या भरल्या आहेत. ... सक्रिय प्रतिबंधक क्षेत्र- १७ सक्रिय सीलबंद इमारती- १२३ २४ तासांतील संपर्कांचा शोध- ३९,८०४ अतिजोखमीचे संपर्क- ५४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान प्रकरण उघड

Beed News:मुलींनो एचपीव्ही लस घ्या; लसीमुळे तुम्हाला कोणताच धोका होणार नाही; अनेकांची पाठ; आकडे सांगताहेत भविष्यातील कर्करोगाची वाट; गैरसमज चुकीचा

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

SCROLL FOR NEXT