मुंबई

गर्दी करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजवर कारवाई

CD
गर्दी करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजवर कारवाई चेंबूर, ता. ९ (बातमीदार) ः परळ गावतील ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनजवळ डिलिव्हरी बॉईजनी गर्दी करून पालिकेचे नियम धाब्यावर बसवल्याने शिवसेनेच्या तक्रारीवरून पालिका व पोलिसांनी डिलिव्हरी बॉईजवर धडक कारवाई करून कार्यालयाला टाळे ठोकले. परेल येथील एफ साऊथ परिसरात परळ गाव आहे. या गावातील चाळीत हे गोडाऊन आहे. काल एकाच वेळी गोडाऊनमध्ये ५० ते १०० डिलिव्हरी बॉईज एकत्र आले होते. सध्या कोरोनाने मुंबई शहरात पुन्हा हाहाकार माजवलेला आहे. त्यातच सर्व एकत्र जमून पालिकेच्या नियमाची पायमल्ली करीत होते. याबाबत नागरिकांनी आमदार अजय चौधरी व शिवसेनेचे नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याकडे तक्रार केली होती. चौधरी यांच्या सूचनेनुसार नगरसेवक अनिल कोकीळ यांनी एफ साऊथ आरोग्य विभाग व पोलिस ठाण्यात तक्रार केली. पालिका अधिकारी यांनी तक्रारीची दखल घेऊन पोलिस अधिकारी यांच्यासमवेत पाहणी करत संयुक्तपणे ६० कर्मचाऱ्यांकडून दंड वसूल केला. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT