मुंबई

केमिकल टाकीची सफाई करताना गॅस गळती, एकाचा मृत्यू, दोघे जखमी

CD
घाटकोपरमध्ये गॅस गळतीत एकाचा मृत्यू कंपनीतील केमिकल टाकीची सफाई करताना दुर्घटना घाटकोपर/अंधेरी, ता. १० (बातमीदार) : घाटकोपर पश्चिमेतील कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेट, नारायण नगर येथे गॅस गळती होऊन एकाचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. एस्के डायस्टफम अॅण्ड ऑरगॅनिक या कंपनीत ही घटना घडली. रामनिवास सरोज (३६) असे मृताचे नाव आहे; तर जखमी रुबिन सोलकर (३६) व सर्वांश सोनवणे (२५) या दोघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. घाटकोपर पश्चिम येथील कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये एस्के डायस्टफम अॅण्ड ऑरगॅनिक कंपनीत केमिकल साठा ठेवणाऱ्या टाकीच्या सफाईचे काम सुरू होते. यावेळी विषारी वायू निर्माण होऊन कामगारांना श्‍वास घेण्यास त्रास जाणवू लागला. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देताच जवानांनी या ठिकाणी धाव घेत कामगारांना बाहेर काढले. त्यात तिघांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, यात रामनिवास सरोज या कामगाराचा मृत्यू झाला. या कंपनीत कापड आणि कागद ब्राइटनर्सकरिता केमिकल उत्पादन करते. दोन दिवसांपूर्वी या कंपनीच्या टाकीमध्ये सायन्युरिक क्लोराइड व मिथेनॉल हे केमिकल साठवले होते. त्यानंतर साफसफाई करताना ही दुर्घटना घडली, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास सरनाईक यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT