मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये विषाणूजन्य तापाची साथ

CD
मिरा-भाईंदरमध्ये विषाणूजन्य तापाची साथ कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर ४० टक्क्यांवर भाईंदर, ता. १० (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात सध्या विषाणूजन्य तापाची जोरदार साथ सुरू आहे. गेल्या एका आठवड्यापासून ही साथ सुरू असून, अंगदुखी, ताप, खोकला आणि सर्दी ही सर्वसामान्य लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. शहरातील महापालिकेचे आणि सर्व खासगी दवाखाने रुग्णांनी तुडुंब भरले आहेत. दरम्यान, शहरातील कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर सध्या ३५ ते ४० टक्क्यांच्या आसपास असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना सदृश लक्षणे दिसताच नागरिकांची कोरोना अँटिजेन चाचणी करणे खासगी डॉक्टरांनाही बंधनकारक करण्यात आल्यामुळे ताप, सर्दी खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णांची डॉक्टरांकडून चाचणी केली जात आहे. सुमारे ४० टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून येत आहेत. बऱ्‍याच रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे सौम्य असल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. हे प्रमाण दोन टक्क्यांच्या आसपास असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान, एक जानेवारीपासून सातत्याने वाढत असलेल्या रुग्णांपैकी पहिल्या कोरोना रुग्णांचा रविवारी मिरा रोड येथे मृत्यू झाला. ही व्यक्ती ७३ वर्षीय होती आणि या व्यक्तीने कोरोना लशीचा एकही डोस घेतलेला नव्हता. लसीकरण न झालेल्यांना तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी स्वत:चे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ! इतकी वर्ष संघासोबत असलेल्या भरवशाच्या खेळाडूने साथ सोडली, MS Dhoni...

Newly Married Woman : 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं, घरात चालू होती तयारी; पण त्याआधीच 23 वर्षांच्या 'या' उच्चशिक्षित माऊलीनं...

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Pune Airport: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल ‘बिकास’च्या प्रतीक्षेत; दीड वर्षापासून बंद, पुनर्विकासासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च

Pune News: चिखली-कुदळवाडीनंतर मोईतही प्रशासनाचा बुलडोझर; अवैध भंगार व्यवसायावर कारवाई, खेड तालुक्यात प्रशासनाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT