मुंबई

मुरबाडमध्ये सहा उमेदवारांची माघार

CD
मुरबाडमध्ये सहा उमेदवारांची माघार मुरबाड, ता. १० (बातमीदार) : मुरबाड नगर पंचायतीच्या चार प्रभागांतील निवडणुकीसाठी पंधरा उमेदवार रिंगणात उरले आहेत. आज सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता खरी लढत शिवसेना व भाजपमध्ये होणार आहे, अशी चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे, तर काँग्रेस मनसेतर्फे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये स्वाती शिरोसे व पूजा शिंदे, प्रभाग क्रमांक १२ मध्ये जगन्नाथ माळी, सुवर्णा माळी व शाम माळी या तीन, तर प्रभाग क्रमांक १७ मध्ये बायमा दुधाळे अशा एकूण सहा उमेदवारांनी माघार घेतल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पारितोष कंकाळ यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजप उमेदवार मानसी देसले यांना शिवसेना उमेदवार नंदा शेळके यांचे आव्हान आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपचे किसन कथोरे व विनोद नार्वेकर यांची मागील निवडणुकीप्रमाणे अटीतटीची लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक बारामध्ये शिवसेनेचे चिंतामण माळी व भाजपचे मोहन गडगे यांच्यामध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वात जास्त पाच उमेदवार रिंगणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता हार्बर मार्गावरही धावणार १५ डब्यांची लोकल, 'या' स्थानकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं! रिझर्व्ह बँकेने ठोठावला 7 लाखांचा दंड; संचालकांच्या संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप भोवलं

हा ट्रेक नव्हता... निसर्गाशी झालेली जिवंत झुंज होती! लोणावळा ते भीमाशंकर ट्रेकचा अनुभव

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Jalgaon ACB Action : 'कॅल्क्युलेटर बाबा'च्या कार्यालयावर धाड! शेतजमीन मोजणीसाठी लाच घेताना 'भूमिअभिलेख'मधील दोघांना रंगेहाथ पकडले; जळगावातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT