

Sharad Pawar Faction Lok Sabha Parliament News
esakal
NCP Sharad Pawar Group : लोकसभेच्या आगामी कामकाजाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद डॉ. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भातील पत्र जारी केले असून, ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत सर्व खासदारांनी लोकसभेत अनिवार्यपणे उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.