मुंबई

अवकाळीने शेतकरी चिंतातूर

CD
अवकाळीने शेतकरी चिंतातुर वीटभट्टी मालकांचेही नुकसान मुरबाड, ता. १० (बातमीदार) : शनिवारपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप व रविवारच्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला व कडधान्य पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले आहे. मुरबाड तालुक्यात पावसाळ्यानंतर बरेच शेतकरी भेंडी, ढोबळी मिरची आदी भाजीपाला पीक घेतात. आता पुन्हा पाऊस पडल्याने या पिकावर रोग पडण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. काही शेतकऱ्यांनी कडधान्य पिके खळ्यात आणली होती; तर काही कडधान्य पिके शेतात तयार झाली होती, ती भिजल्याने नुकसान झाले आहे. मातीच्या तयार झालेल्या कच्च्या विटांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी विटा प्लास्टिक टाकून झाकून ठेवाव्या लागल्या आहेत. शिवाय पाऊस असताना विटा तयार करण्याचे काम बंद ठेवावे लागते. त्यामुळे दुहेरी नुकसान झाले आहे. कोट अवकाळी पाऊस पडल्याने भात पिकानंतर शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केलेल्या व आता काढणीसाठी आलेल्या उडीद, मूग, चवळी आदी कडधान्याचे नुकसान झाले आहे. वाल, हरभरा पिकाचेसुद्धा नुकसान झाले. - शंकर कोर, शेतकरी, असोळे या वर्षी दोनतीन वेळा पाऊस पडल्याने कच्च्या विटांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विटांचा भाव सात हजार रुपये प्रतिहजारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. - महेश देसले, वीटभट्टी चालक फोटो ओळी मुरबाड : पावसापासून संरक्षण करण्यासाठी प्लास्टिक टाकून विटा झाकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT