मुंबई

आरोग्याबाबतच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकतो का?

CD
आरोग्याबाबतच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकतो का? लोकल बंदीविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा सवाल सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १० : नागरिकांच्या आरोग्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असेल; तर न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करू शकते का, असा प्रश्न आज खंडपीठाने उपस्थित केला. लसीकरण न झालेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासास मनाई करण्यासंबंधित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा सवाल केला. राज्य सरकारने कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच रेल्वे प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत दोन परिपत्रक सरकारने जारी केले आहेत. या परिपत्रकांना दोन स्वतंत्र जनहित याचिकेद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी झाली. नागरिकांच्या आरोग्याबाबत केंद्र किंवा राज्य सरकारने एखादा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये न्यायालय कितपत हस्तक्षेप करू शकते आणि तो निर्णय रद्दबातल करू शकते का, असा सवाल खंडपीठाने सुनावणीदरम्यान उपस्थित केला. याबाबत पुढील सुनावणीमध्ये युक्तिवाद करण्याचे निर्देश न्यायालयाने सर्व पक्षकारांना दिले आहे. केंद्र सरकारने लस घेणे ऐच्छिक ठेवले आहे. त्यामुळे राज्य सरकार असा भेदभाव करू शकत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. राज्य सरकार अशाप्रकारे विधिमंडळाची पूर्वपरवानगी न घेता निर्णय घेऊ शकत नाही, असा युक्तिवाद ॲड. नीलेश ओझा यांनी केला आहे. राज्य सरकारने जारी केलेले परिपत्रक राज्याचे पालक या नात्याने काढले आहे आणि नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. लसीकरण केल्यामुळे प्रतिबंधक शक्ती वाढून त्याचा उपयोग कोरोनाचा सामना करण्यासाठी होतो. अर्थात लसीकरण केले म्हणजे कोरोना होत नाही असे नाही; पण ते संरक्षक उपाय आहेत. राज्यात सुमारे ७५ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजे त्यांच्यासाठी लस प्रभावी ठरली आहे, असे निरीक्षण न्यायालयाने सरकारच्या प्रतिज्ञापत्रावरून व्यक्त केले. राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय गैर आहे, हे कायदेशीर पद्धतीने मांडण्याचे निर्देश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. लसीकरणामुळे संरक्षण! लसीकरण हे शंभर टक्के संरक्षण नसले; तरी औषधेदेखील शंभर टक्के संरक्षण देऊ शकत नाहीत. तुम्हाला मधुमेह आहे आणि तुम्ही औषध घेता म्हणजेच ते तुम्हाला संरक्षित करत असते. तसेच या लसीकरणाचेही आहे, असे मुख्य न्यायमूर्ती म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT