मुंबई

संपकरी संघटनेने ॲड. सदावर्तेंना हटवले; नवीन वकिलांची नियुक्ती

CD
एसटी कर्मचाऱ्यांचा लढा ॲड. सतीश पेंडसे लढणार संपकरी संघटनेने ॲड. सदावर्तेंना हटवले किंवा संपकरी संघटनेने ॲड. सदावर्तेंना हटवले नवीन वकील ॲड. सतीश पेंडसे यांची नियुक्ती सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १० : महामंडळाच्या भविष्यासाठी एसटी संपकऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केले असताना दुसरीकडे महाराष्ट्र कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या जागी ॲड. सतीश पेंडसे यांची नियुक्ती केली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान ॲड. सदावर्ते यांनी न्यायालयीन लढा दिला. मात्र, आता त्यांना दूर करण्यात आले आहे. विलीनीकरणासाठी ३ नोव्हेंबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेल्या बेकायदा संपाच्या विरोधात एसटी प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सुरुवातीला गुजर यांनी ॲड. होशंग तफ्ती यांची नियुक्ती केली होती. मात्र, काहीच दिवसांत त्यांना बदलून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना नेमण्यात आले. मात्र आता त्यांच्या जागी ॲड. पेंडसे यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारे ॲड. सदावर्ते संपकरी संघटनेचे वकील म्हणून एसटीच्या संपात ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा देताना दिसून आले. डंके की चोट पर विलीनीकरण मिळणार, असे सांगून एसटी कर्मचाऱ्यांना संपात टिकवून ठेवण्याचे काम त्यांनी केले. ॲड. सदावर्ते आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन संपातील कर्मचाऱ्यांना संबोधतांना अनेक वेळा दिसून आले. मात्र, दरम्यानच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांकडून न्यायालयीन लढा लढण्याच्या नावावर आणि निलंबित, सेवा समाप्ती वा बडतर्फीची कारवाई होऊ न देण्यासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम गोळा केल्याचे आरोप झाले. त्यावरून संपकरी संघटना आणि ॲड. सदावर्ते यांच्यात मतभेद झाले होते. संपकरी संघटना संप मागे घेण्याच्या विचारात असताना ॲड. गुणरत्न सदावर्ते मात्र विलीनीकरणावर ठाम होते. त्यांच्या भूमिकेमुळे अखेर संपकरी संघटनांनी संपातून माघार घेतली. त्यामुळे ॲड. सदावर्ते यांच्याशी फार सलोख्याचे संबंध नसल्याने अखेर आता संपकरी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी वकील बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. विलीनीकरणाचा पुढील लढा आता ॲड. पेंडसे लढणार असल्याचेही गुजर यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT