मुंबई

रॉकेलवर चालणारी परंपरिक साधने कालबाह्य

CD
रॉकेलवर चालणारी पारंपरिक साधने कालबाह्य कंदिल, स्टोव्ह, चिमणी, बत्ती काळाच्या ओघात अडगळीत ------------- माणगाव, ता. ११ (बातमीदार) : विद्युत साधनांचा प्रसार होण्यापूर्वी शहरी व ग्रामीण भागात स्वयंपाक आणि उजेडासाठी हमखास वापरली जाणारी साधने आता कालबाह्य झाली आहेत. स्वयंपाकासाठी स्टोव्ह, तर उजेडासाठी घरोघरी रॉकेलच्या चिमण्या, कंदील, बत्ती वापरल्या जात होत्या. प्रत्येकाच्या घरात याचा समावेश असायचा; मात्र प्रगत युगात ही साधने कालबाह्य झाल्याने त्या आता अडगळीत गेल्या आहेत. प्रत्येक घरामध्ये एका कोनाड्यात चिमणी, कंदील, बत्ती आदी वस्तू ठेवल्या जात. संध्याकाळ झाल्यानंतर या वस्तूंचा वापर करून प्रकाश मिळवला जाई. घरात, सार्वजनिक कार्यक्रमात प्रकाश देणाऱ्या या वस्तू हमखास असत. या वस्तूंना त्या काळी मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यासाठी रॉकेलचा वापर केला जाई. अलीकडच्या काळात विद्युत, गॅसवरील साधनांचा वापर वाढला आहे. सर्वांच्या घरात विद्युत दिवे हमखास असतात. स्वयंपाक घरातही स्टोव्हऐवजी गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळातील स्टोव्ह, चिमण्या, कंदील, बत्ती या वस्तू कालबाह्य झाल्या आहेत. बहुतांशी या वस्तू रॉकेलचा वापर करून प्रकाशित केल्या जात. रेशनवर मिळणाऱ्या या वस्तू वापरणे सर्वसामान्यांना परवडणारे होते. विद्युत व्यवस्था ग्रामीण भागात पोहोचली नव्हती. या व इतर कारणांमुळे अनेक लोक या परंपरागत वस्तूंचा उजेडासाठी वापर करत असत. काही वर्षांपासून वीज, प्रकाश देणाऱ्या साधनांचा, लहान-मोठ्या सेलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय, रेशनिंगवरील रॉकेल मिळणे बंद झाले असून रॉकेलचा भावही वाढला आहे. त्यातच इतर इंधनाचा वापर वाढला आहे. त्यामुळे घरोघरी असणाऱ्या चिमण्या आदी पारंपरिक वस्तू आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी साधने कालबाह्य झाली आहे. सद्यस्थितीत या वस्तू अडगळीत किंवा वस्तुसंग्रहालयात पाहावयास मिळतात. ------------------------------------- पूर्वी घरोघरी रॉकेलवर चालणारी पारंपरिक साधने स्वयंपाक व उजेडासाठी वापरली जात होती. अलीकडे प्रगत साधनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे परंपरागत स्टोव्ह, चिमण्या, कंदील ही साधने कालबाह्य झाली आहेत. शेतीच्या कामासाठीही आवर्जून इलेक्ट्रिक बॅटरी व अन्य साधने वापरली जातात. त्यामुळे जुनी साधने कालबाह्य झाली. - सीताराम पोटले, शेतकरी पूर्वीची घरगुती साधने हल्‍ली वापरली जात नाहीत. नवीन वस्तूंचा वापर वाढल्याने जुन्या वस्तू अडगळीत गेल्या आहेत. या वस्तू जपून ठेवणे आवश्यक आहे. - किसन ठाणेकर, ज्येष्ठ नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT