मुंबई

कंपनी अधिकाऱ्याला माजी कामगारांकडून धमकी

CD
कंपनी अधिकाऱ्याला माजी कामगारांकडून धमकी रोहा (बातमीदार) : धाटाव एमआयडीसीतील बेव्हरेज लिमिटेड कंपनीतील अधिकारी सौरभ कपूर यांना कंपनीच्या आत जाण्यासाठी माजी १० कामगारांनी अटकाव केला. त्यानंतर त्यांना शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ कपूर हे आपल्या सहकाऱ्यांसह २७ डिसेंबरला दुपारी १२:३० वाजता बेव्हरेज लिमिटेड या कंपनीत जात होते. त्याच वेळी लीलाधर मोरे, रामचंद्र कडव, वामन मोरे, महेश जोशी, अमित भायदे, वीरेंद्र वारंगे, दत्तात्रेय मोरे, विजय वारंगे, अनिल वारंगे, तुकाराम रटाटे यांनी त्यांना कंपनीच्या आता जाण्यासाठी अडवणूक केली. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. या सर्व १० जणांविरुद्ध रोहा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार डी. जे. म्हशीलकर पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

SCROLL FOR NEXT