मुंबई

संन्यासी महिलेची ४ लाख रुपयांची पेन्शची रक्कम लंपास

CD
संन्यासी महिलेच्या पेन्शनवर डल्‍ला चार लाखांच्या फसवणूकप्रकरणी खारघर पोलिसांत गुन्हा नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : खारघर सेक्टर-५ मधील महालक्ष्मी मंदिरातील वृद्ध संन्यासी महिलेला (७३) डेबिट कार्ड सुरू करून देण्याच्या बहाण्याने तिच्या पेन्शनचे तब्बल चार लाख रुपये परस्पर लंपास केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिला खारघर सेक्टर-५ मधील महालक्ष्मी मंदिरातील संन्यासी असून ४० वर्षापूर्वी त्या अमेरिकेतील एका कंपनीत मोठ्या पदावर कामाला होत्या. निवृत्तीनंतर भारतात येऊन त्‍यांनी संन्यास घेतला. या महिलेला अमेरिकेतील कंपनीकडून पेन्शन मिळत असल्याने त्यातून त्या उदरनिर्वाह चालवत होत्या. महिलेकडील एसबीआय बँकेचे डेबिट कार्ड बंद असल्याने ते पुन्हा सुरू करण्यासाठी २५ डिसेंबर रोजी गुगलवरून एसबीआयच्या हेल्पलाईनचा शोध घेतला. ऑनलाईनवर त्‍यांना मिळालेल्‍या क्रमांकवर त्‍यांनी संपर्क केला असता, एकाने एसबीआयचा कर्मचारी असल्याचे सांगून संन्यासी महिलेचे डेबिट कार्ड सुरू करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांना मोबाईलवर एनी डेस्क हे ॲप सुरू करण्यास सांगितले आणि डेबिट कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने त्‍यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर त्‍यांच्या बँक खात्यातून ४ लाख २ हजार ७२६ रुपये परस्‍पर काढले. महिलेची प्रकृती बिघडली बँक खात्‍यातून चार लाख दोन हजार ७२६ रुपये गेल्‍याचा मेसेज मोबाईलवर आल्‍यावर वृध्द महिलेची तब्‍येत बिघडली. उपचार घेतल्‍यावर आठवडाभरानंतर त्‍यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्‍यानुसार पोलिसांनी फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT